आठ ‘अ’ मुद्यावरून ग्रामस्थ आक्रमक

By Admin | Updated: August 19, 2014 00:52 IST2014-08-19T00:52:55+5:302014-08-19T00:52:55+5:30

ग्रामसभेत ग्रामस्थांनी नमुना आठ ‘अ’च्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले.

Landless aggressor from eight 'A' issue | आठ ‘अ’ मुद्यावरून ग्रामस्थ आक्रमक

आठ ‘अ’ मुद्यावरून ग्रामस्थ आक्रमक

सायखेड : येथून जवळच असलेल्या चोहोगाव ग्रामपंचायतच्या १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी नमुना आठ ह्यअह्णच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. गत ३0 ते ४0 वर्षांंपासून चोहोगाव व सायखेड येथील काही ग्रामस्थ गावठाण जागेवर घरकुल बांधून राहत आहेत. ग्रामपंचायतकडून पूर्वी त्यांना स्वमालकीचा गाव नमुना आठ अ मिळत होता; परंतु काही महिन्यांपासून या लोकांना आठ अ हा नमुना सरकारी मालमत्तेचा मिळत असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. चोहोगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा धामणदरी येथे घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी नमुना आठ ह्यअह्णच्या मुद्यावरून आक्रमक होऊन ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच यापूर्वी ग्रामसभेत कोर्‍या रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेऊन कोणतेही ठराव मंजूर केला जात होते. परंतु यावेळी ग्रामसेवकाने ठराव लिहिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. नंतर ग्रामसभा संपन्न झाल्याचा शेरा मारून ग्रामस्थांनी स्वाक्षरी केल्या. ही ग्रामसभा ह्यइन कॅमेराह्ण झाल्यामुळे घेतलेल्या ठरावाव्यतिरिक्त ग्रामस्थांना मान्य नसलेले ठराव मंजूर केल्यास संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. यावेळी ग्रामसभेत महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. प्रभारी सरपंच भाऊराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सदस्य प्रेमदास राठोड, संजय मागाडे, पोलिस पाटील, मनोहर कोहर, ग्रामसेवक महेंद्र बोचरे व गावकर्‍यांची उपस्थिती होती.

Web Title: Landless aggressor from eight 'A' issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.