किराणा दुकान फोडून रोख रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:14+5:302021-08-26T04:22:14+5:30

प्रवीण बाळकृष्ण वानखडे (वय ३१, रा. मनात्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नेहमीप्रमाणे दि. २४ ऑगस्ट रोजी किराणा दुकान रात्रीच्या ...

Lampas broke into a grocery store | किराणा दुकान फोडून रोख रक्कम लंपास

किराणा दुकान फोडून रोख रक्कम लंपास

प्रवीण बाळकृष्ण वानखडे (वय ३१, रा. मनात्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नेहमीप्रमाणे दि. २४ ऑगस्ट रोजी किराणा दुकान रात्रीच्या सुमारास बंद करून फिर्यादी प्रवीण वानखडे व त्याचा चुलत भाऊ फिरायला गेले होते. त्यानंतर परतल्यावर त्यांना दुकान फोडलेले दिसले. दुकानात पाहणी केली असता दुकानातील १२ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणात दोन संशयितांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, फिर्यादीच्या तक्रारीवरून संशयित दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गजानन राठोड पुढील तपास करीत आहेत.

--------------------------------------

पातुरात व्यापऱ्यावर प्राणघातक हल्ला

पातूर: पातूर-बाळापूर रोडवरील बोर्डीनदीच्या पुलाखाली शहरातील कापड व्यवसायिक प्रकाश पाटील (५३) जखमी अवस्थेत पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला. व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. दरम्यान, पातूर पोलिसांनी जखमीस तातडीने पुढील उपचाराकरिता सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Lampas broke into a grocery store