शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लालसिंग हत्याकांडाचा तपास बाश्रीटाकळी पोलिसांकडून काढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:35 IST

अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बाश्रीटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बाश्रीटाकळी पोलिसांकडून हा तपास काढण्यात आला. मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी या हत्याकांडाचा तपास करणार आहेत.

ठळक मुद्देराजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होतीदोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बाश्रीटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बाश्रीटाकळी पोलिसांकडून हा तपास काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बार्शिटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बार्शिटाकळी पोलिसांकडून हा तपास काढण्यात आला. मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी या हत्याकांडाचा तपास करणार आहेत.लालसिंग राठोड व त्यांची पत्नी, मुलगी शेतात कापूस वेचण्यासाठी ६ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गेल्या होत्या, मुलगी व पत्नी घरी परतल्या मात्र लालसिंग राठोड हे शेतातच थांबले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. यावेळी त्यांचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळय़ात दिसून आला होता. त्यानंतर मृतक राठोड यांचा मुलगा किरण राठोड याने बाश्रीटाकळी पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मुलगा किरणच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी गावातील नाभरे व एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच मृतकाची मुलगी व पत्नीवर पोलिसांचा संशय होता. त्या दिशेने पोलिसांनी तपासही केला होता. मात्र पोलिसांना आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपींना पकडता आले नाही. त्यामुळे राठोड यांची हत्या कुणी केली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दोन महिने उलटले तरीही आरोपी पकडल्या न गेल्याने मृतक राठोड यांची पत्नी व मुलगा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी त्यांची मागणी मान्य करीत बार्शिटाकळी पोलिसांकडून तपास काढून घेतला आहे. बाश्रीटाकळी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता हा तपास मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिला आहे.

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळीCrimeगुन्हाPoliceपोलिस