‘लेडी फिंगर’ जमिनीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 23:12 IST2016-08-28T23:12:56+5:302016-08-28T23:12:56+5:30

मागणीपेक्षा पुरवठा अधिक; शेतक-यांवर आता भेंडी मातीमोल भावाने विकण्याची वेळ.

'Lady Finger' on the ground! | ‘लेडी फिंगर’ जमिनीवर!

‘लेडी फिंगर’ जमिनीवर!

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २८: उन्हाळ्यात आणि पंधरा दिवसांपूर्वी भाव खाणारी लेडी फिंगर आता जमिनीवर आली आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत असल्याने, शेतकर्‍यांवर आता भेंडी मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्यात चक्क १२0 रुपये किलोप्रमाणे लहान आकाराची कोवळी भेंडी विकल्या जात होती. त्यामुळे शेतकर्‍यांनाही बर्‍यापैकी उत्पन्न मिळत होते. दरम्यान, अलीकडच्या काळात म्हणजेच जुलैच्या सुरुवातीला ८0-१00 रुपयांपर्यंंंत भेंडीचे दर स्थिरावले होते. मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस भेंडीच्या दरात कमालीची घसरण होत आहे. ८0 रुपयांवरून, ६0 रुपये, त्यानंतर ४0-३0-२0 रुपये, अशी सातत्याने भेंडीच्या भावात घसरण झाली. आता चक्क दहा रुपये किलोप्रमाणे भेंडी किरकोळ बाजारात विकली जात आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत भेंडीच्या किमतीची कल्पनाच न केलेली बरी, असा सूर बाजारात ऐकायला मिळत आहे. मातीमोल भावाने भेंडी विकल्या जात असल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, किरकोळ विक्रेत्यांनाही भेंडी विकणे मजुरीलाही महाग झाल्याचे दिसून येते.


अशी झाली घसरण!
१00-१२0 रु.         मे - जून
८0-९0 रु.            जून - जुलै
६0 - ४0 रु.          जुलै ऑगस्ट
२0 - १0 रु.           ऑगस्ट अखेर

शेतक-यांची कोंडी
उन्हाळ्यात बर्‍यापैकी भाव मिळत असतानाही विहिरी आटल्याने, पाणी कमी पडत होते. त्यामुळे अनेकांना उत्पादन घेता आले नाही. आता बर्‍यापैकी पाऊस झाला आहे. पावसामुळे भरघोस उत्पादन मिळत आहे. मात्र, अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांची चांगलीच कोंडी होत आहे. दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.

Web Title: 'Lady Finger' on the ground!