पिंजर परिसरात नेटवर्कचा अभाव; ग्राहक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:29+5:302021-04-03T04:15:29+5:30

पिंजर परिसरात बीएसएनएलसह खासगी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात टॉवरांची उभारणी केली. ग्राहकांंना चांगली सुविधा मिळावी, यासाठी अधिकारी ...

Lack of network in the cage area; Customer distressed! | पिंजर परिसरात नेटवर्कचा अभाव; ग्राहक त्रस्त!

पिंजर परिसरात नेटवर्कचा अभाव; ग्राहक त्रस्त!

पिंजर परिसरात बीएसएनएलसह खासगी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात टॉवरांची उभारणी केली. ग्राहकांंना चांगली सुविधा मिळावी, यासाठी अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात;मात्र परिसरात नेटवर्कचा अभाव असल्याने ग्राहकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. नेटवर्कसंबंधी ग्राहकांनी तक्रार केली तर, त्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत शासकीय कार्यालयात बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. बीएसएनएलची सुविधा वारंवार ठप्प होत असल्याने बॅंकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बॅंकमध्ये नागरिकांना व्यवहारासाठी चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन परिसरातील नेटवर्कची समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.

------------------------

पिंजर परिसरात काही तांत्रिक अडचणीमुळे नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण होत असेल, नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.

अमोल रंगारी, बीएसएनएल, बार्शीटाकळी.

---------------------------

पिंजर परिसरात मोबाईलला नेटवर्क नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच बॅंकेतही लिंक उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. नेटवर्कसंबंधित तक्रार करूनही दुर्लक्ष केल्या जाते. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

- सचिन पाटील अवघाते, पिंजर

Web Title: Lack of network in the cage area; Customer distressed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.