सांडपाण्याच्या वादावरून कुऱ्हाड मारली; दोघे अटकेत

By Admin | Updated: June 16, 2017 02:17 IST2017-06-16T02:17:13+5:302017-06-16T02:17:13+5:30

बाळापूर : बाळापूर शहरातील गाझीपुरा भागामध्ये सांडपाण्याची नाली काढण्याच्या वादावरून एकास कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना १५ जून रोजी घडली.

Kurwad kills the promise of sewage; Both arrested | सांडपाण्याच्या वादावरून कुऱ्हाड मारली; दोघे अटकेत

सांडपाण्याच्या वादावरून कुऱ्हाड मारली; दोघे अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : बाळापूर शहरातील गाझीपुरा भागामध्ये सांडपाण्याची नाली काढण्याच्या वादावरून एकास कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना १५ जून रोजी घडली.
गाझीपुरा भागात राहणारे सुरेश उदेभान मोरे (५२) यांचा घरासमोरील सांडपाण्याची नाली काढण्याच्या कारणावरून मंगेश रामदास निंबाळकर आणि रामदास निंबाळकर यांच्याशी वाद झाला. त्या वादावरून मंगेश व रामदास यांनी सुरेश मोरे यांना कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केले . याबाबतच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसानी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध भादंवि ३२६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Kurwad kills the promise of sewage; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.