शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

कृषीच्या विद्यार्थ्यांनी उद्योकतेकडे वळावे -  कुलगुरू विलास भाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 14:15 IST

अकोला : कृषी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा उद्योग सुरू करावे असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले.

अकोला : कृषी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा उद्योग सुरू करावे असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाव्दारे शुक्रवार,१४ डिंसेबर रोजी विद्यार्थी,उद्योजक मेळाव्याचे आयोजन कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु लगुरू डॉ. विलास भाले होते. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुरेंद्र काळबांडे,उद्योजक गणेश देशमुख, परेश इंधाने, पराग शहा, ए.एन. जोशी,दीपक खाडे,संजय वायाळ,विक्रम बोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. भाले यांनी आपल्या प्रचंड युवाशक्ती आहे. तथापि नोकऱ्या मर्यादित आहेत. त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी नोकºयाएवजी उद्योगात उतरणे गरजेचे आहे. कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तंत्रज्ञान संशोधनातून निर्माण करावे,कारण बदलत्या काळात शेतकरी तंत्रज्ञान अवगत करीत असून, मागणी वाढत आहे. या उद्योगात विद्यार्थ्यांनी उतरावे कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांना यासाठीचे मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे.यासाठी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी शाखेला योजना मिळाली असून, उद्योजक उभे करण्यासाठी या योजनेतर्गत विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यासाठीचे तीन प्रशिक्षण घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. नागदेवे यांनी कृषी विद्यापीठाला मिळालेल्या उद्योजक प्रशिक्षण केंद्राचा लाभ शेतकºयांनी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध यंत्र विकसीत केले असून, विद्यार्थ्यांनी या यंत्राची उभारणी करावी, असे आवाहन केले.या प्रसंगी उद्योजक, कृषी व्यवसाय टाकण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करू न देणारे उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मेळाव्या डॉ. विवेक खांबलकर, धिरज कराळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदीसक कृषी अभियांत्रिकी महविद्यालयाच्या राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे अधिकारी,कर्मचाºयांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ