शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार केंद्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST2021-05-23T04:17:48+5:302021-05-23T04:17:48+5:30
कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांसाठी मंडप उभारून पाण्याची व्यवस्था करावी, असे आदेश पालकंत्री बच्चू कडू यांनी आरोग्य ...

शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार केंद्र कार्यान्वित
कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांसाठी मंडप उभारून पाण्याची व्यवस्था करावी, असे आदेश पालकंत्री बच्चू कडू यांनी आरोग्य उपसंचालकांना दिले. यावेळी पालकंत्र्यांनी परिचारिका, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक व रुग्णसेवकाच्या समस्यां जाणून घेतल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, आकोट तहसीलदार निलेश मडके, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, ठाणेदार संतोष महल्ले, ज्ञानोबा फड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष तोरणेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश दातीर तसेच प्रहार संघटनेचे बल्लू जवंजाळ, निखिल गावंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, सुशील पुंडकर, तुषार पाचकोर, कुलदीप वसू, विशाल भगत, मुन्ना साबळे, अचल बेलसरे, बली राजा, समीर जमादार आदी उपस्थित होते.