शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:19 IST

अकोला : आंबेडकरी अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.

ठळक मुद्देसंतत्प अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.अशोक वाटीका चौकात महिलांनी रस्त्यावर ठीय्या आंदोलन केले. तुकाराम चौक परिसरातील भेळ सेंटर, आमलेटच्या हातगाड्यांची तोडफोड केली.

अकोला : कोरेगाव भीमा येथील शहरात कडकडीत बंद पाळला जात असताना आंबेडकरी अनुयायी रस्त्यारस्त्यांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत आहेत. संतत्प अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. आंदोलनात महिलांचाही सहभाग असून, अशोक वाटीका चौकात महिलांनी रस्त्यावर ठीय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आंबेडकरी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जुने बसस्थानकाजवळ वादआंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी टॉवर चौकाकडून मोहम्मद अली रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेल्या दुकाने बंद करण्यास सांगितले. परंतु काही दुकानदारांनी नकार दिल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. प्रकरण चिघळणार असल्याचे पाहून, पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे वाद निवळला.आंदोलनात भारिपचे पदाधिकारी सहभागीकोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी केलेल्या बंद आंदोलनामध्ये भारिप बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, प्रदीप वानखडे, जि.प. माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, मनपाचे माजी गटनेता गजानन गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जीवन डिगे, मोहन लाखे, अ‍ॅड. छोटू सिरसाट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष सचिन शिराळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.कोरेगाव भीमा घटनेचा संभाजी ब्रिगेडकडून निषेधकोरेगाव भीमा घटनेच्या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी जनतेच्या बंद आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा देत, कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. अशोक वाटीका चौकातील आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, चेतन ढोरे, मयुर पाटील, नितीन सपकाळ, आनंद पाटील, अमित ठाकरे, शुभम घिमे आदी सहभागी झाले होते.

राऊंड परिसरातील घरांवर दगडफेककाही युवकांनी तुकाराम चौक परिसरातील भेळ सेंटर, आमलेटच्या हातगाड्यांची तोडफोड केली. एवढेच नाहीतर राऊंड रोडवरील कोकाटे, बिसेन आणि धस बिल्डर यांच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे नागरीक भयभित झाले होते. नागरीकांनी घराची दरवाजे, खिडक्या बंद करून घरात राहणेच पसंत केले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहरNarendra Modiनरेंद्र मोदी