Kolhapur: काॅलेजमधून टीसी आणायला गेलेली मुलगी बेपत्ता

By सचिन राऊत | Updated: May 19, 2024 23:16 IST2024-05-19T23:16:18+5:302024-05-19T23:16:40+5:30

Akola News: जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील रहीवासी २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या बहीनीने जुने शहर पाेलिस ठाण्यात दिली. यावरुन पाेलिसांनी युवती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तीचा शाेध सुरु केला आहे.

Kolhapur: Girl who went to fetch TC from college goes missing | Kolhapur: काॅलेजमधून टीसी आणायला गेलेली मुलगी बेपत्ता

Kolhapur: काॅलेजमधून टीसी आणायला गेलेली मुलगी बेपत्ता

- सचिन राऊत
अकाेला - जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील रहीवासी २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या बहीनीने जुने शहर पाेलिस ठाण्यात दिली. यावरुन पाेलिसांनी युवती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तीचा शाेध सुरु केला आहे. अंजली निळकंठ नवरंगे वय ३७ वर्ष रा. वाशिम बायपास शिवसेना वसाहत यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीन वैष्णवी गणेश शेटे वय २१ वर्ष ही तिच्या आई-वडिलांना खंडेलवाल कॉलेजमधून टीसी आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरून निघून गेली. बराचवेळ झाल्यानंतरही परत न आल्यामुळे तिचा वर्गमित्राला फोन केला असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगीतलले. त्यानंतर नातेवाइक तसेच मीत्र व मैत्रीनीकडे शाेध घेतला असता मुलगी न मीळाल्याने त्यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी बेपत्ता असल्याची नाेंद करीत युवतीचा शाेध सुरु केला आहे.

Web Title: Kolhapur: Girl who went to fetch TC from college goes missing

टॅग्स :Akolaअकोला