शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:59 IST2019-11-02T14:59:22+5:302019-11-02T14:59:27+5:30
देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.

शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले!
अकोला: शेतीच्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांना मारहाण करून शेतकऱ्यास चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घुसरवाडी येथे घडली. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
घुसरवाडी येथे राहणारे देवीकिसन लक्ष्मण घावट (३४) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याच नात्यातील अनिल शालीग्राम घावट, अशोक घावट, अंकुश अनिल घावट, संजय समाधान घावट यांच्यात गत काही वर्षांपासून वाद आहे. शुक्रवारी हा वाद उफाळून आला. या वादात अनिल घावट, अशोक घावट, अंकुश व संजय घावट आणि अनिल व अशोक यांच्या पत्नींनी देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात देवीकिसन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)