Knife attack on one for minor reason in Akola | क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला

क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला

अकोला : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने नागेश बापुराव जगताप (३०) यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला. ही घटना एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक करुन गुन्हा दाखल केला.
शिवनी येथील रहिवासी निखील ऊर्फ सोनु घ्यारे (२८) आणि जगदीश घ्यारे (२९) या दोघांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागेश पापुराव जगताप या युवकाकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली होती. नागेशने पैसे देण्यास नकार दिल्याने निघील आणि जगदीश या दोघांनी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. घटनेत नागेशच्या पोटाला गंभीर इजा झाली असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी काट्याजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: Knife attack on one for minor reason in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.