चिमुकलीची हत्या करणारा बाप कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:45 IST2017-09-25T19:44:53+5:302017-09-25T19:45:11+5:30
अकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्या तिच्या बा पास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे.

चिमुकलीची हत्या करणारा बाप कारागृहात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्या तिच्या बा पास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे.
नायगाव येथील संजयनगरातील रहिवासी शेख फिरोज शेख रशीद याची पाच वर्षीय चिमुकली आलिया परवीन ही शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता ती बेपत्ता झाली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या आईने वडील शेख फिरोज याला भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी आलियाचा शोध सुरू केला; मात्र रात्री उशिरापर्यंत ती मिळाली नाही. तीन दिवसांनंतर आलिया परवीन हिचा मृतदेह नायगाव कचरा डेपोत एका पोत्यात बांधलेला नग्नावस्थेत आढळला होता. पोलिसांनी गुन्हा दा खल करून तपास सुरू केला. अत्यंत क्लिष्ट असलेल्या या प्रकरणात आलिया परवीनचा बाप शेख फिरोज शेख रशीद यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हो ती. त्यानंतर कोठडी संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.