चार महिन्यांच्या चिमुकलीचे घरातून अपहरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2024 10:46 IST2024-01-11T10:46:08+5:302024-01-11T10:46:48+5:30
पोलिसात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

चार महिन्यांच्या चिमुकलीचे घरातून अपहरण!
बबन इंगळे, बार्शीटाकळी : तालुक्यातील निंबी येथील रहिवाशी बाबाराव सिद्धार्थ करवते यांची अवघ्या चार महिन्याची चिमुकली कु. ईश्वरी हिचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी बुधवार, १० जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर राहत्या घरातून अपहरण केले. या घटनेची माहिती आपत्कालीन पोलीस सेवेच्या क्रमांकावर दिल्यानंतर पोलीस पथक त्वरित निंबी येथे डॉग स्कॉडसह घटनास्थळी हजर झाले.
पोलिसांनी रात्रभर घटनास्थळ परिसर पिंजून काढला. परंतु चिमुकलीच्या अपहरणाबाबत कोणताही सुगवा लागला नाही. याप्रकरणी अपहरण कर्त्या चिमुकलीच्या वडिलाने पोलिसात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.