शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:25 IST

अकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ रोजी राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले. समृद्ध वन्य जीवांचा अधिवास असलेल्या या अभयारण्यामुळे अकोला जिल्हय़ांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

ठळक मुद्देगुरुवार, ८ फेब्रुवारी - स्थापना दिवस

राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ रोजी राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले. समृद्ध वन्य जीवांचा अधिवास असलेल्या या अभयारण्यामुळे अकोला जिल्हय़ांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

अभयारण्यातील वन्य जीवांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करता यावे, या कारणास्तव १९९६ मध्ये हे अभयारण्य प्रादेशिक वन विभागाकडून नवनिर्मित अकोला वन्य जीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. तेव्हापासून या अभयारण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही अकोला वन्य जीव विभागाकडे आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावीचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक यांच्याकडे आहे. काटेपूर्णा अभयारण्य हे एक वन वर्तुळ असून, त्यात पाच नियतक्षेत्रे आहेत. परिसर सुजलाम-सुफलाम करणारी काटेपूर्णा याच अभयारण्यातून वाहते, तर अकोला शहराची तहान भागविणारे विस्तीर्ण जलाशय याच अभयारण्यालगत आहे. ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात साग वृक्षाचे प्राबल्य असल्याने पानगळीचे वन आहे. आकाराने लहान व चहुबाजूंनी मानववस्तीने वेढलेले असले, तरी या अभयारण्यात बिबट, तरस, कोल्हे असे मांसभक्षी प्राण्यांसह नीलगाय, चितळ, भेकर, काळवीट आदी वन्य प्राणीदेखील आहेत. या वन्य प्राण्यांमुळे काटेपूर्णाला समृद्ध जीवन प्राप्त झाले असून, गेल्या तीन दशकांपासून त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी अभयारण्य प्रशासन निर्भीडपणे पार पाडत आहे. २0१३-१४ ते २0२२-२३ या कालावधीसाठी अभयारण्य व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास शासनाची मंजुरीही मिळाली आहे. त्यात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविली जाणार आहे. वन पर्यटनाच्या माध्यमातून सर्वंकष विकास व रोजगार उपलब्धी हा उद्देशसुद्धा वन्य प्रशासनाला यामुळे साध्य होणार आहे. वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व अधिवास यासाठी जल व मृदसंधारणाची अनेक कामे या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. विकासात्मक दृष्टिकोनातून अभयारण्यात पर्यटकांसाठी सशुल्क जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. जंगलाची माहिती दर्शविणारी उद्बोधक फलके, सेल्फी पॉइंट, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापुढे पर्यटकांना दर पौर्णिमेला अभयारण्यातील मचानांवर बसून वन्य प्राणी न्याहाळता येणार आहेत. 

टॅग्स :Katepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्यAkola Ruralअकोला ग्रामीण