शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:45 IST

अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.

अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना गुरुवारी रात्री १.३0 वाजताच्या सुमारास इटारसीजवळ घडली. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.रा. स्व. संघाचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी रेखा खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल (५४), पुष्पा खंडेलवाल (५२), जुगलकिशोर खंडेलवाल (४२), शर्मिला खंडेलवाल (४0), रिंकू खंडेलवाल (३८) आदींसह १५ जण सिकंदराबाद-दानापूर रेल्वेगाडीने जात असताना, इटारसी ते पिपरिया रेल्वेस्थानकाच्या दरम्यान रेल्वेगाडीच्या जनरल डब्यातून साखळी ओढून दहा दरोडेखोरांनी रेल्वेगाडीच्या बी-४ डब्यात प्रवेश केला. या डब्यात बसलेले दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल, जुगल खंडेलवाल, शर्मिला खंडेलवाल, रिंकू खंडेलवाल यांना धारदार चाकूचा आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख आणि क्रेडिट व डेबिट कार्डसुद्धा हिसकावून घेतले. याच डब्यातील एका प्रवाशाने विरोध केला, तर त्याच्या हातावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. गोपाल खंडेलवाल व रेखा खंडेलवाल हे ए-१ डब्यात होते. त्याच्या डब्यातील कर्मचाऱ्याला हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे या डब्यात दरोडेखोर प्रवेश करू शकले नाहीत. या प्रकरणात जबलपूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पिपरिया जीआरपी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (प्रतिनिधी)खासदार धोत्रे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट!खासदार संजय धोत्रे यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांना घटनाक्रम सांगितला. या प्रकरणाची चौकशी करून दरोडेखोरांना जेरबंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार धोत्रे यांच्या सांगण्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्री गोयल यांनी रेल्वे अधिकाºयांना तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी त्वरित भुसावळ व इटारसी रेल्वे अधिकाºयांशी संपर्क साधला आणि कारवाई करण्यास सांगितले. खासदार धोत्रे, आमदार शर्मा, आमदार सावरकर यांनी गोपाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाrailwayरेल्वेKumbh Melaकुंभ मेळा