शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 10:55 IST

निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.

- प्रवीण खेतेअकोला : कोरोना विषाणू प्रामुख्याने फुप्फुसांवर अटॅक करतो. त्यामुळेच शरीरातील आॅक्सिजनची पातळी खालावते अन् अनेकांना जीव गमवावा लागतो; पण वेळीच फुप्फुसाकडे लक्ष देऊन ते निरोगी ठेवल्यास कोरोनापासून असणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य आहे. त्यामुळे निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या अन् मृत्यूदर हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे; परंतु अशा परिस्थितीत घाबरण्यापेक्षा खबरदारी म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या फुप्फुसाची नीगा राखणे, तसेच फुप्फुसांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. फुप्फुस हा आपल्या शरीरातील महत्त्वाचे अंग असून, वातावरणातून आॅक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर सोडणे हे फुप्फुसाचे महत्त्वाचे कार्य आहे. या माध्यमातूनच आॅक्सिजन रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतो; मात्र कोरोना विषाणू थेट याच फुप्फुसांवर अटॅक करत असल्याने न्युमोनिया होतो. परिणामी आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. रुग्णाला कृत्रिम आॅक्सिजन द्यावे लागते; मात्र फुप्फुसांची क्षमता कमी असल्याने त्याला एकाच वेळी शंभर टक्के आॅक्सिजन स्वीकारणे शक्य नसते. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. ही परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून नागरिकांनी, विशेषत: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक व्यायाम करणे गरजेचे आहे.

कोरोनाचा दोन प्रकारे हल्लाअप्पर रिस्पेरेक्टरबहुतांश रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा हल्ला हा अप्पर रिस्पेरेक्टर म्हणजेच घशापर्यंतच झालेला असतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांच्या फुप्फुसापर्यंत कोरोना विषाणू पोहोचत नसल्याने त्यांना जास्त धोका नसतो.

लोअर रिस्पेरेक्टरप्रामुख्याने ५० वर्षावरील व्यक्ती किंवा ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लोअर रिस्पेरेक्टर म्हणजेच फुप्फुसांपर्यंत झालेला असतो. त्यामुळे फुप्फुसाच्या ल्युकस लेअरला बाधा होऊन न्युमोनिया तयार होतो. न्युमोनियाचे प्रमाण वाढल्यास आॅक्सिजनची पातळी कमी होत जाते. ८० टक्के लोकांचा न्युमोनिया बरा होत असला, तरी फुप्फुसाची लवचीकता कमी होते. परिणामी आॅक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होते.कोरोनामुक्त झाल्यावर हे करा मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकसायकलिंगजोराने श्वास घेणेकाही सेकंद श्वास रोखून ठेवणेछातीच्या मसल्सचे हलके व्यायामशक्य असल्यास धावणेप्राणायाम करणेखानपानावर द्या लक्ष

धूम्रपानासह अ‍ॅसिडिटीमुळे फुप्फुसातील म्युकस लेअर खराब होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दम लागणे, कफ होणे, खोकला, अशा समस्या उद््भवतात. त्यामुळे धूम्रपान टाळलेलेच बरे. शिवाय आहारामध्ये अ‍ॅन्टी आॅक्सिडंट घटक असलेले भाजीपाला, फळांचे सेवन करावे. शरीरातील अवयव निरोगी असेल, तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. कोरोना काळात तर हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने फुप्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना फुप्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी स्पायरोमॅट्री, पल्मोनरी रिहॅबीलेटेशन हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम केल्यास कोरोनामुळे झालेल्या क्षतीतून लवकर बरे होऊ शकतो. - डॉ. सागर थोटे, छाती रोग व फुप्फुस रोग तज्ज्ञ, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या