शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

घरांप्रमाणेच गाव, शहर स्वच्छ ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:43 IST

‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी टिळक रोड येथील मंगलदास मार्केट परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वत: हातात झाडू घेऊन कचरा साफ केला. जनतेने आपल्या परिसराबरोबरच गाव, शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी टिळक रोड येथील मंगलदास मार्केट परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वत: हातात झाडू घेऊन कचरा साफ केला. जनतेने आपल्या परिसराबरोबरच गाव, शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.या मोहिमेत नगरसेवक, मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पालकमंत्री म्हणाले, की निरोगी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला. स्वच्छता हीच सेवा ही मोहीम २ ऑक्टोबरपयर्ंत राबविण्याचे त्यांनी सूचित केल्यानंतर राज्य शासनाने ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्याचे निश्‍चित केले. त्या अनुषंगाने आपला जिल्हा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करणे गरजेचे आहे. गाव पातळीवरदेखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक शौचालय वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मार्च-२0१८ पयर्ंत जिल्हा संपूर्णपणे हगणदरीमुक्त करण्यात येईल. लोकांनीदेखील मोठय़ा प्रमाणात स्वच्छता अभियानाच्या या चळवळीत सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर, आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

नागरिकांशी साधला संवादयानंतर पालकमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील तारफैल भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून शौचालयाची पाहणी केली. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, त्यांनी तत्काळ शौचालय बांधावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तारफैल भागातील सार्वजनिक शौचालयांचीदेखील त्यांनी पाहणी करून जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वच्छतेबाबतच्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचनाही दिल्या.

मोहिमेचा घेतला आढावासदर कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, मनपा आयुक्त अजय लहाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विलास खिल्लारे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदींसह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.