शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 2:27 PM

जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला ‘कायाकल्प पुरस्कार- २०१८-१९’ जाहीर करण्यात आला आहे.

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत कायाकल्प अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत राज्य शासनातर्फे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला ‘कायाकल्प पुरस्कार- २०१८-१९’ जाहीर करण्यात आला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागात कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. यामध्ये रुग्णालय देखभाल, स्वच्छता, पुरक सेवा, जैविक कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता प्रोत्साहन असे सहा निकष लावण्यात येतात. जिल्हा व राज्यस्तरावरील पथकाद्वारे जिल्हा स्त्री रुग्णालय अकोलाबाळापूर ग्रामीण रुग्णालयाची तीन स्तरावर पाहणी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी दोन्ही जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार घोषित केला. जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, कार्याकल्प कार्यक्रम २०१८-१९ साठी जिल्हा स्त्री रुग्णालयाला तीन लाख, तर बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला एक लाख रुपये असा निधी पुरस्कार म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बुलबुले तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर राठोड, प्रशांत ठाकरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व डॉ. उत्पला देशभ्रतार, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक यांनी दोन्ही रुग्णालयांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलBalapurबाळापूर