कश्मीरमधील ते ४८ तास अंगावर शहारे आणणारेच

By Admin | Updated: September 18, 2014 01:15 IST2014-09-18T01:15:34+5:302014-09-18T01:15:34+5:30

कारंजाच्या मामदानी दाम्पत्याची आपबिती.

In Kashmir, it is only 48 hours to bring the city to the walls | कश्मीरमधील ते ४८ तास अंगावर शहारे आणणारेच

कश्मीरमधील ते ४८ तास अंगावर शहारे आणणारेच

कारंजा : श्रीनगर येथे पर्यटनासाठी थांबल्यावर अनपेक्षितपणे पूराने रौद्र रूप धारण केले व पाहता पाहता पाणी चक्क गळ्यापर्यंत येऊन टेकले. जड वाहने डोळ्यासमोरून अलगद वाहून जायला लागलीत. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागताच जीवाच्या आकांताने आर्त किंकाळ्या उठल्यात. आम्ही पर्यटनास आलो असलो तरी हे आमच्या आयुष्याचे अंतिम पर्व होते ही अनामिक भीती मनात विजेसारखी चमकून गेली. मृत्यू अगदी आमच्यासमोर उभा ठाकला होता. कोणत्याही क्षणी पूर आम्हाला आपल्या मिठीत घेईल असे वाटायला लागले. अंत:करणापासून ह्यअल्लाहह्ण ची प्रार्थना करायला लागलो अन् अचानक लष्करी जवान व स्थानिक लोकांच्या रूपात देवदूत आमच्या समोर उभे झालेत. त्यांच्या मदतीने आम्ही पूरामधून सुखरूप बाहेर पडलो. पण या भीषण दृष्याच्या कल्पनेने आजही अंगावर शहारे उठतात, अशी आपबिती सांगितली आहे येथील मामदाणी दाम्पत्याने.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील पूरात अडकलेले तौसिफ मामदानी व अलमास मामदाणी हे दाम्पत्य सोमवारी त्यांच्या येथील निवासस्थानी परतले. त्यांनी ह्यलोकमतह्ण कडे आपली ह्यआपबितीह्ण कथन केली. त्यांनी सांगितलेला अनुभव थक्क करणारा आहे. जम्मू काश्मीर भ्रमणासाठी गेलेले हे दाम्पत्य १ सप्टेंबरपासून श्रीनगरमधील बरबरशहा परिसरातील ह्यऑल सिझनह्ण या हॉटेल मधील पहिल्या माळ्यावर थांबले होते. देशाच्या इतर ठिकाणाहून आलेले ३0 पर्यटकही तेथे त्यांच्यासोबत होते. ७ सप्टेंबर रोजी अनपेक्षितपणे झेलम नदीला भीषण पूर आला व पाहता पाहता या हॉटेलचे दोन माळे पाण्याखाली आले. आकस्मिकपणे आलेल्या संकटाने मामदानी दाम्पत्य गांगरून गेले. त्यातच तौसिफच्या ह्यमोबाईलह्णचे नेटवर्कही बंद पडले मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या या पर्यटकांना वाचविण्यासाठी जाती धर्माच्या भिंती गळून पडल्यात. ह्यमानवताह्ण हीच ह्यजातह्ण व ह्यधर्मह्ण मानून स्थानिक लोकांनी या दाम्पत्याला ह्यऑल सिझनह्ण हॉटेलच्या सहाव्या माळ्यावर नेले व तेथून त्यांना नजिकच्या उंच भागावर असलेल्या ह्यकाश्मिर रिसोर्टह्ण या ठिकाणी पोहोचविले. अशा परिस्थितीत दुसरा दिवस उजाडला. तरीही संकट पाठ सोडत नव्हते. पूराची भीषणता वाढत चालली होती. मामदानी दाम्पत्य एकमेकांना हिंमत देत होते. हळूहळू ह्यकाश्मिर रिसोर्टह्ण ही पाण्याखाली आले. मात्र लष्कराच्या जवानांनी ह्यरेस्क्यू ऑपरेशनह्ण ला गती देवून मामदानी दाम्पत्याला या ह्यरिसोर्टह्ण मधून सुखरूप बाहेर काढले व छावणीत नेले. तेथे हे दाम्पत्य अन्नपाण्याविना अडकून पडले. अखेर ९ सप्टेंबर रोजी या दाम्पत्याला भारतीय क्रिकेटपटू परवेझ रसूल याचा मित्र तन्वीर हुसैनने आपल्या कारने रैनावरी भागातील उंच ठिकाणावर असलेल्या ह्यहॉटेल बुर्जह्ण येथे पोहोचविले. त्यानंतर केन्द्र शासनाने मामदानी दाम्पत्याला विमानाने दिल्लीपर्यंत सुखरूप सोडल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

Web Title: In Kashmir, it is only 48 hours to bring the city to the walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.