शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास कनिष्ठ महाविद्यालये उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 2:18 PM

शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाने ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही.

अकोला: राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाने ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही.फेब्रुवारी व मार्च २0१९ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करायची आहे. शासनाच्यावतीने सतत तीन वर्षे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते; परंतु गतवर्षीसुद्धा अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहितीच सादर केली नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदासुद्धा शासनाने दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. त्यामुळे २८ मार्चपर्यंत दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांची नावे, बँक खात्यांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाने मागविली आहे. विद्यार्थ्यांची माहिती सादर केल्यास, त्यांच्या नावाने धनादेश काढून, बँक खात्यांमध्ये हे माफ केलेले परीक्षा शुल्क तातडीने जमा व्हावे, या दृष्टिकोनातून तातडीने कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील एकाही कनिष्ठ महाविद्यालयाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केले. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात आली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी तातडीने माहिती सादर करावी. विद्यार्थ्यांना शुल्क माफी न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

 

 

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास कनिष्ठ महाविद्यालये उदासीन!अकोला: राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाने ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही.फेब्रुवारी व मार्च २0१९ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करायची आहे. शासनाच्यावतीने सतत तीन वर्षे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते; परंतु गतवर्षीसुद्धा अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहितीच सादर केली नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदासुद्धा शासनाने दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. त्यामुळे २८ मार्चपर्यंत दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांची नावे, बँक खात्यांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाने मागविली आहे. विद्यार्थ्यांची माहिती सादर केल्यास, त्यांच्या नावाने धनादेश काढून, बँक खात्यांमध्ये हे माफ केलेले परीक्षा शुल्क तातडीने जमा व्हावे, या दृष्टिकोनातून तातडीने कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील एकाही कनिष्ठ महाविद्यालयाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. (प्र्रतिनिधी)दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केले. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात आली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी तातडीने माहिती सादर करावी. विद्यार्थ्यांना शुल्क माफी न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा