जवाहरनगरात घरफोडी; दागिने लंपास

By Admin | Updated: January 12, 2017 02:25 IST2017-01-12T02:25:28+5:302017-01-12T02:25:28+5:30

अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले एक लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले.

Jawaharagarh burglary; Jewelry lump | जवाहरनगरात घरफोडी; दागिने लंपास

जवाहरनगरात घरफोडी; दागिने लंपास

अकोला, दि. ११- जवाहर नगरातील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले एक लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जवाहर नगरात राहणारे राजेंद्र हिंमतराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी व ते पातूर येथे नोकरी करतात. त्यामुळे घरातील दरवाजाला कुलूप लावून बुधवारी सकाळी ते पत्नीसह पातूरला निघून गेले.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. सायंकाळी घरी परतल्यावर देशमुख यांनी घरातील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यावर कपाटातील सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. देशमुख यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Jawaharagarh burglary; Jewelry lump