जावयाने जाळले सास-याचे घर!

By Admin | Updated: March 27, 2017 21:34 IST2017-03-27T21:34:52+5:302017-03-27T21:34:52+5:30

अकोला जिल्ह्यातील हातरूण येथील घटना

Javanese burnt her mother-in-law! | जावयाने जाळले सास-याचे घर!

जावयाने जाळले सास-याचे घर!

उरळ (जि. अकोला), दि. २७- क्षुल्लक काणावरून झालेल्या वादात जावयाने सासर्‍याचे घर जाळल्याची घटना हातरूण येथे २७ मार्च रोजी दुपारी घडली. या प्रकरणी जावयाविरुद्ध उरळ पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हातरूण येथील शे.आसीफ शे.रफीक यांनी उरळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शे.उमेद शे.मुक्तार याने आपल्याबरोबर २७ मार्च रोजी वाद घातला. या वादातून त्याने आपले घर जाळले. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शे.आसीफ यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी शे.उमेद विरुद्ध कलम ४५२, ४३६, ४२७, ५0४ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक साठवणे, जमादार संजय कुंभार, श्रीकृष्ण डांगे, विजय चव्हाण आदी करीत आहेत.

Web Title: Javanese burnt her mother-in-law!