दोन हजार शिवभक्तांचा अकोल्यातील राजेश्वराला जलाभिषेक
By Admin | Updated: August 28, 2014 01:46 IST2014-08-28T01:25:58+5:302014-08-28T01:46:14+5:30
तब्बल दोन हजार शिवभक्तांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला.

दोन हजार शिवभक्तांचा अकोल्यातील राजेश्वराला जलाभिषेक
अकोला : जुने शहरातील रेणुकानगरस्थित जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्या तब्बल दोन हजार शिवभक्तांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला. १0१ भरण्यांची कावड, आकर्षक देखावा, लेजीम पथकांचा समावेश व संस्थानची शिस्तबद्ध परिक्रमा शहरात कौतुकाचा विषय ठरली. अकोलेकरांचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या शिवलिंगाला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा बाभळेश्वर संस्थानने मागील १६ वर्षांपासून जोपासली आहे. यंदाही संस्थानच्यावतीने १0१ भरण्यांची कावड काढण्यात आली. कावडवर जय बाभळेश्वर मंदिरासह शिवलिंगाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. कावडमध्ये ग्राम राजंदा येथील आखाड्याचे २00 जणांच्या लेजीम पथकाचा समावेश होता. तसेच ग्राम बारलिंगा, रिधोरा, भौरद, डाबकी, अमानतपूर ताकोडा येथील युवकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. संस्थानच्यावतीने तब्बल २ हजार शिवभक्तांनी २५ ऑगस्ट रोजी राजेश्वराला जलाभिषेक केला.