जैन समाजाने संघटित होण्याची गरज - बोकाडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:47 IST2017-08-27T19:45:34+5:302017-08-27T19:47:39+5:30
देशातील सर्वच समाजांमध्ये एकता पाहावयास मिळते; परंतु जैन समाज मात्र विखुरलेला आहे. विकास करायचा असेल, तर जैन समाजानेही इतर समाजांप्रमाणे संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी रविवारी येथे केले.

जैन समाजाने संघटित होण्याची गरज - बोकाडिया
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: देशातील सर्वच समाजांमध्ये एकता पाहावयास मिळते; परंतु जैन समाज मात्र विखुरलेला आहे. विकास करायचा असेल, तर जैन समाजानेही इतर समाजांप्रमाणे संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी रविवारी येथे केले.
जैन दिगंबर समाजाच्या पयरुषण पर्वानिमित्त स्थानिक दिगंबर जैन मंदिरात रविवारी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोकाडिया बोलत होते. यावेळी प्रा. तुकाराम बिरकड, दीपचंद बिलाला, रमेश तोरावत जैन यांची प्रमुख उपस्थि ती होती. सत्कार समारंभाला उपस्थित कलाकारांना संबोधित कर ताना बोकाडिया म्हणाले, की कोणतेही कार्य करण्यासाठी समाजाने संघटित होणे गरजेचे आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महावीर जयंती पर्वावर ५00 कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली होती; परंतु समाज संघटित नसल्याने या पैकी ५ रुपयेदेखील मिळू शकले नाहीत, अशी खंत बोकाडिया यांनी व्यक्त केली. यावेळी संगीतकार रमेशचंद्र उणवणे, किशोर बळी, गीताबाली उणवणे, डॉ. सुनील गजरे, निखिल बोंडे, माजी मिस विदर्भ कोमल, मनीष उनवणे, संदीप जोशी, मालती बोंडे, पिं पळकर, डॉ. शेख चांद नौरंगाबादी, राधिका साठे, विजय बंगाले आणि आर्किटेक्ट संजीव जैन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास् ताविक रमेश तोरावत जैन यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन राजेश बिलाला यांनी केले. यावेळी जैन समाजबांधव मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.