बाळापूर येथील आयटीआयच्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:40 IST2018-07-21T18:39:17+5:302018-07-21T18:40:13+5:30
बाळापूर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने बाळापूर येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेल्या नरेंद्र दामोदर लोमटे यांचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली.

बाळापूर येथील आयटीआयच्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
बाळापूर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने बाळापूर येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेल्या नरेंद्र दामोदर लोमटे यांचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली.
बाळापूर येथील आयटीआयमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी नरेंद्र दामोदर लोमटे (४२)रा.मोठी उमरी अकोला हे दुचाकी क्र.एमएच २९ एच ७७०२ ने २० जुलै रोजी सकाळी कार्यालयात जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर बायपासच्या निर्गुणा नदीवरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये लोमटे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान, सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेविषयी बाळापूर पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती. (शहर प्रतिनिधी)