शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:22 IST

अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत.

अकोला : राज्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असली, तरी पश्चिम वऱ्हाड तील तीन जिल्हे तहानलेलेच आहेत. अद्याप अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत.वºहाडात यावर्षी २३ जून रोजी मान्सूनने प्रवेश केला. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर चार आठवडे दडी मारली. २६ जुलै रोजी जेमतेम पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसात जोर नव्हता. ३० जुलै रोजी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर पाऊसच नाही. पाऊस आला तर काही मोजक्या भागात पडतो. ढग मात्र प्रचंड दाटून येतात; पण पाऊसच पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९१ मि.मी. आहे; परंतु आजमितीस जिल्ह्यात ३८७.४ मि.मी. पाऊस झाला. या पावसाची गती मात्र तुरळक आहे. मागील चोवीस तासांत रविवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला असून, ३३.५ पावसाची नोंद झाली.

-बुलडाणाबुलडाणा जिल्ह्यात रविवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५८.९३ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक ८१.२१ टक्के तर बुलडाणा तुलक्यात ७६.६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.दुसरीकडे रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने वार्षिकसरासरीची ५० गाठली असली तरी जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा झालेला नाही. तो होण्यासाठी जिल्ह्याला सार्वत्रिक व दमदार पावसाची गरज आहे.

-वाशिमगत नऊ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने रविवार, ४ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच विश्रांती घेतली. रविवारी पाऊस पडला नाही. गुरुवार, २५ जुलैपासून जिल्ह्यात कमी-अधिक स्वरूपात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली. रविवार, ४ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९८ मि.मी. आहे. तथापि, आजमितीस ३९७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमDamधरणRainपाऊस