शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात प्रथमच सोलर पॅनलद्वारे शेतावर सिंचन!

By admin | Updated: March 2, 2015 01:18 IST

पारंपरिक विजेपासून मुक्तता, अपारंपरिक विजेवर पाच एकरावर ओलित.

अकोला : भारनियमनामुळे होणार्‍या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी,विदर्भातील शेतकरी अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्यावर भर देत आहेत. विदर्भातील पहिल्या सोलर पॅनलचा उपयोग करू न यवतमाळ जिल्हय़ातील लासिना गावच्या शेतकरी महिलेने पाच एकर शेतावर यशस्वी सिंचन केले आहे.विदर्भातील कृषिपंपाचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. वीज उपलब्ध असूनही ग्रामीण भागात सातत्याने १६ ते १८ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा निर्णय विदर्भातील शेतकर्‍यांनी घेतला असून, कृषी क्षेत्रात सोलर पॅनलची सुरुवात यवतमाळ जिल्हय़ातून झाली आहे. या जिल्हय़ातील नीना हरीश त्रिवेदी या शेतकरी महिलेने पाच एकर शेतात साडेतीन अश्‍वशक्तीचे १४ सोलर पॅनल लावले आहेत. या पॅनलपासून त्यांना ३३६0 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. यावर्षी त्यांनी पाच एकरावर सेंद्रिय पद्धतीने डाळिंब फळ पिकाची लागवड केली आहे. हे सोलर पॅनल सूर्याच्या कलाप्रमाणे वळत (ऑटो सिस्टीम) सकाळी ७ ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत शेतकर्‍यांना या सोलरपासून वीजपुरवठा होत असल्याने या शेतकरी महिलेची भारनियमनातून कायमची सुटका झाली आहे. या १४ सोलर पॅनलचा खर्च नीना त्रिवेदी यांना जवळपास ९ लाख रुपये आला आहे. खर्च सुरुवातीला मोठा वाटत असला तरी या सोलरपासून येणारी २0 वर्ष कुठलाही व्यत्यय न येता वीज उपलब्ध होणार आहे. या एका सोलरपासून २.१४ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे १४ पॅनल येथे असून, यामध्ये वाढ करता येते म्हणजे ७.५ अश्‍वशक्तीपर्यंत या सोलरची क्षमता वाढवता येते. सतत होणारे भारनियम आणि परिणामी सोसावे लागणारे पिकांचे नुकसान, यावर उपाय म्हणून कृषी सोलर पॅनल यशस्वी ठरले असल्याची प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील महिला शेतकरी लीना त्रिवेदी यांनी दिली. राज्याचे सोलर पॅनल तज्ज्ञ अशोक अग्रवाल यांनी विदर्भात आता सोलर पॅनलची मागणी वाढत असून, विजेवर शेतकर्‍यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याचे सांगीतले.