बँकेतील चोरीप्रकरणी आरोपींचा आंध्र प्रदेशात शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:07 IST2017-08-28T01:07:43+5:302017-08-28T01:07:59+5:30
अकोला : गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरदिवसा झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संशयावरून या चोरट्यांचा आंध्र प्रदेशात शोध सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे आंध्रातील असल्याचे स्पष्ट झाले असून, ते सदर गावातूनही फरार झाल्याची माहिती आहे; मात्र यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला चोरटा हा आंध्रातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या गावातून या चोरट्याचे भाऊ व भावजय पसार झाल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले.

बँकेतील चोरीप्रकरणी आरोपींचा आंध्र प्रदेशात शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरदिवसा झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संशयावरून या चोरट्यांचा आंध्र प्रदेशात शोध सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे आंध्रातील असल्याचे स्पष्ट झाले असून, ते सदर गावातूनही फरार झाल्याची माहिती आहे; मात्र यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला चोरटा हा आंध्रातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या गावातून या चोरट्याचे भाऊ व भावजय पसार झाल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले.
गांधी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेच्या कामात व्यस्त असताना बँकेच्या इतर ग्राहकांसोबतच तीन व्यक्तीदेखील बँकेत पोहोचले. या तिघांनी बँकेतील कर्मचार्यांच्या काउंटरवर भेट देऊन कर्मचार्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी व अधिकारी व्यस्त असल्याचे निदर्शनास येताच त्यांचाच साथीदार असलेला चौथा व्यक्ती बँकेच्या आतमध्ये आला. त्याने थेट रोकड विभागात प्रवेश केला. रोकड विभागातील पाच लाख रुपयांची रोकड बॅगेत टाकू न पळ काढला. महाराष्ट्र बँकेच्या रोकड विभागात जाऊन त्यामधील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन एक चोर सर्वांचे लक्ष चुकवून निघून गेल्याने एकाही बँक अधिकारी व कर्मचार्याच्या लक्षात न आल्याने पोलीसही अवाक् झाले होते. बँकेच्या व्यवस्थापकाने सिटी कोतवाली पोलिसांना या चोरीची माहिती दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चार जणांनी चोरी केल्याचे दिसून आले. यामध्ये एका चोरट्याचा चेहरा स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय डहारे यांचे एक पथक आंध्र प्रदेशात गेले, त्या ठिकाणी सदर चोरट्याचे छायाचित्र दाखविले असता हा चोर त्या गावातील असल्याचे समोर आले; मात्र सदर चोरटा त्याचा भाऊ आणि भावजयसह गावातून पसार झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांना खाली हात परतावे लागले असून, या तिघांचा शोध आता नव्याने सुरू केला आहे.