‘रेमडेसिविर इंजेक्शन’च्या वापराची तपासणी सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:55+5:302021-05-07T04:19:55+5:30

अकोला: खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे वाटप जिल्हा प्रशासनामार्फत कोविड रुग्णालयांना करण्यात ...

Investigation into the use of ‘remedicivir injection’ begins! | ‘रेमडेसिविर इंजेक्शन’च्या वापराची तपासणी सुरु !

‘रेमडेसिविर इंजेक्शन’च्या वापराची तपासणी सुरु !

अकोला: खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे वाटप जिल्हा प्रशासनामार्फत कोविड रुग्णालयांना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाटप करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा योग्य पद्धतीने वापर होत आहे की, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या चार पथकांमार्फत बुधवारपासून तपासणी सुरु करण्यात आली आहे. अकोला शहरातील खासगी कोविड रुग्णालये आणि औषधीच्या दुकानांना भेटी देऊन पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या विक्रीतील काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी रुग्णांसाठी औषधीच्या दुकानांमधून कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. वाटप करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी योग्य पद्धतीने होतो की नाही, तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार इंजेक्शनचे वाटप करण्यात येते की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार चार तपासणी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत अकोला शहरातील खासगी कोविड रुग्णालयांना वाटप करण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन व त्याचा रुग्णांसाठी करण्यात आलेला वापर तसेच शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले की नाही, याबाबतची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित खासगी कोविड रुग्णालये आणि औषधीच्या दुकानांना भेटी देऊन पथकांमार्फत यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी अकोला शहरातील खासगी कोविड रुग्णालयांना वाटप करण्यात येत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या पथकांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित कोविड रुग्णालये आणि औषधीच्या दुकानांना भेटी देऊन ही तपासणी केली जात आहे.

डाॅ.निलेश अपार

उपविभागीय दंडाधिकारी, अकोला.

Web Title: Investigation into the use of ‘remedicivir injection’ begins!