कुणबी समाजबांधवांचे परिचय स्नेहमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:58+5:302021-02-05T06:17:58+5:30
कुणबी समाजबांधवांचा परिचय व स्नेहमेळावा आयोजित केला होता. मेळाव्याच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत, लेखक तथा ...

कुणबी समाजबांधवांचे परिचय स्नेहमिलन
कुणबी समाजबांधवांचा परिचय व स्नेहमेळावा आयोजित केला होता. मेळाव्याच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत, लेखक तथा वरिष्ठ पत्रकार सन्माननीय सुरेश नागले होते, तर प्रमुख उपस्थितीत प्रभाकरराव मानकर व जगन्नाथ तिडके उपस्थित होते. प्रथम सत्राचे संचालन डॉ. प्रा. हरिदास आखरे यांनी केले, दुसऱ्या सत्रात विशेष अतिथी म्हणून डॉ. संदीप डवंगे यांनी आपली भूमिका विशद केली. राम भेलके यांनी प्रास्ताविक केले.
दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी जवकार होते. प्रा. सदाशिव शेळके आणि केदार ढोरे प्रमुख अतिथी म्हणून स्थानापन्न झाले होते. महेंंद्र कराळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अकोला, तेल्हारा, हिवरखेड, सोनाळा, बाळापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव, शेगाव आदी ठिकाणांवरून कुणबी समाजबांधव आले होते.