शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीचा निधी परस्पर देणा-या बीडीओंची चौकशी

By admin | Updated: May 12, 2017 08:24 IST

अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमधील प्रकार

अकोला : सहायक गटविकास अधिकाऱ्यांना वगळून दलित वस्ती विकास निधीतून कोट्यवधी रुपयांचे वाटप करणाऱ्या जिल्ह्यातील तीन गटविकास अधिका-यांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या गटविकास अधिका-यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती माधुरी गावंडे, रेखा अंभोरे, देवका पातोंड यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. शासनाने सहायक गटविकास अधिकारी पद निर्माण करतानाच त्या पदाला अधिकारही दिले आहेत; मात्र त्यांचे अधिकार डावलून अनेक फायली त्यांच्याकडे सादरच केल्या जात नाहीत. त्यातच अनेक आर्थिक खर्चाच्या फायलींचा समावेश आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. तरीही गटविकास अधिकाऱ्यांनी दलित वस्ती विकास योजनेचा निधी संबंधित अभियंता आणि स्वत: वितरित केला. याबाबत जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मुद्दा उपस्थित केला. हा प्रकार अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये सुरू असल्याचे उपस्थित सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा गंभीर प्रकार आहे, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करा, अहवालासाठी मुदत निश्चित करण्याची जोरदार मागणी सदस्यांनी केली. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौकशी करून अहवाल देतील, असे निर्देश सभेत देण्यात आले. तेल्हा-यात पुन्हा प्रतिनियुक्त्या तेल्हारा पंचायत समितीमध्ये १४ शिक्षकांना प्रतिनियुक्त्या देण्यात आल्या. त्या नियमबाह्य आहेत. सभापती, गटविकास अधिकाऱ्यांची मंजुरी नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्या परस्पर केल्या. त्यांच्यावर कारवाईची मागणी शोभा शेळके, दामोदर जगताप, लव्हाळे यांनी लावून धरली. त्यावर संबंधितांची खातेचौकशी करण्याचे सांगण्यात आले. सोबतच मोेफत पाठ्यपुस्तके वाटपातील शेकडो पुस्तके पंचायत समितीमध्ये पडून आहेत. त्याची चौकशी करून ती गरजूंना देण्याची मागणीही करण्यात आली. जनसुविधा, तीर्थक्षेत्र निधी खर्चासाठी मुदतवाढीची मागणीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधेची कामे करणे, तीर्थक्षेत्राच्या विकासाचा निधी ३१ मार्च रोजी परत गेला आहे. त्याची मुदत संपल्याने तो खर्च करता येत नाही. त्यामुळे हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव पाठवावा, असे गोपाल कोल्हे यांनी सांगितले. दानवेंच्या निषेधाचा ठरावशेतक-यांच्या घामातूनच देश चालतो. त्या शेतकऱ्यांना अपशब्द बोलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी अवमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्याचा ठराव सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला. तो मंजूर झाला. सोनकुसरे यांचा प्रभार काढामहिला व बालविकास अधिकारी एस.पी.सोनकुसरे कोणतेच काम करत नाहीत, तसेच सभेच्या दिवशी सुटीवर जातात. त्यामुळे टीएचआर पुरवठ्याची माहिती गेल्या सहा महिन्यांपासून दिली जात नाही. त्यांचा प्रभार काढून त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत सुटीवरच पाठवा, अशी मागणीही शेळके यांनी केली.