शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2019 : आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगा आवश्यक  - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:00 IST

अकोला: आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर सुदृड राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

अकोला: आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर सुदृड राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. आज संपुर्ण जगात 21 जुन हा पाचवा आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्त डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दिक्षांत समारंभ सभागृहात 21 जुन 2019 रोजी सकाळी 7 वाजता आयोजीत योग शिबीरात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महापौर विजय अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव , शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद , प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठक, औद्योगीक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. भंडारे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन योग शिबीराची सुरवात करण्यात आली, शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या योग शिक्षकांनी योगाचे धडे ‍दिले. या वेळी ताडासन, वृक्षासन, हस्तपादासन , पद्मासन, वक्रासन, हलासन, चक्रासन, भुजंगासन आदि प्रकारच्या आसनासह कपाल भारती, अनुलोम-विलोम,भ्रांमरी,उदगी, यासारखे विविध प्राणायामचे प्रकार तसेच हात ,मान, व पायाचे व्यायाम शिकविण्यात आले या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या अबालवृध्दांनी अत्यंत लयबध्द व शिस्तबध्द पध्दतीने योगासने केलीत. कार्यक्रमाचे संचलन ॲड. सुहास काटे यांनी केले. उपस्थ‍ितांचे आभार जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी मानले.योग शिबीर यशस्वी करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नेहरु युवा केंद्र , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, राष्ट्रीय सेवा योजना , एन.सी.सी., अकोला जिल्हा युवक फोरम, पतंजली योग समिती ,अजिंक्य साहसी ग्रृपचे धनंजय भगतसह विविध सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले.या शिबीरामध्ये शासकीय , निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शाळा, महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी ,पंतजली योग समिती ,पोलीस प्रशिक्षण केंद्र ,एनसीसी व एनएसएस , स्काऊट गाईड, योग भारती, क्रिडा भारती, किसान भारती, इंडियन मेडिकल असोशिएशन , योग परिषद , अंजिक्य फिटनेस पार्क , योगासन व सांस्कृतिक मंडळ, योग विदयाधाम, योगासन सेवा समिती , आरोग्य भारती, ब्रम्हकुमारी विश्वविदयालय , स्वयंसिध्दा प्रशिक्षण केंद्र , संत निरंकारी मंडळ, प्रताप्रती गृप, गायत्री गृप, आर्य समाज मंडळ आदींसह शेकडो योगप्रेमी सहभागी झाले होते.

टॅग्स :AkolaअकोलाYogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनHealthआरोग्य