शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्पर्धा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:39 PM

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ (कृषी) कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधीक गुण मिळवित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाने पटकाविले.

- नीलिमा श्ािंगणे-जगडअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ (कृषी) कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधीक गुण मिळवित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाने पटकाविले. तीन दिवसीय या स्पर्धेचा समारोप सोमवारी झाला. महाबीज अकोला व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.स्पर्धेत राहुरी, परभणी, महाबीज, दापोली विद्यापीठासह महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघ सहभागी झाले होते. तीनशेच्या वर महिला व पुरुष खेळाडूंनी स्पर्धेत खेळप्रदर्शन केले. बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या गटात पाच आणि महिला गटात चार संघ सहभागी झाले. पुरुषांमध्ये परभणी व पीकेव्ही संघात अंतिम सामना होऊन यामध्ये परभणी संघाने विजय मिळविला. महिलांमध्ये राहुरी संघाने पीकेव्ही संघाचा पराभव केला. बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात पाच संघ सहभागी होऊन अंतिम सामना परभणी व राहुरी संघात झाला. राहुरीने सामना जिंकला. महिलांच्या गटात पीकेव्ही व राहुरी संघात सामना होऊन पीकेव्ही अकोला संघाने विजय मिळविला. महिला गटात तीन संघ सहभागी झाले होते. व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषांचे सहा संघ सहभागी होऊन, नऊ फेऱ्या खेळले. अंतिम सामना पीकेव्ही व परभणी संघात झाला. पीकेव्ही संघाने सामना जिंकला. बास्केटबॉल स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. यामध्ये सात फेरी खेळल्या गेल्या. अंतिम सामना राहुरी व पीकेव्ही संघात अतितटीचा झाला. घरच्या मैदानावर यजमान पीकेव्ही संघाचा पराभव करू न राहुरी संघाने स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित केले. क्रिकेट साखळी सामन्यांमध्ये नऊ फेरी होऊन परभणी, दापोली, राहुरी व पीकेव्ही संघाने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. परभणी व राहुरी संघात अंतिम सामना झाला; मात्र दोन्ही बलाढ्य संघाने सामन्याच्या शेवटपर्यंत सुंदर खेळप्रदर्शन केले. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघाला समान गुण देण्यात आले.सामना समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. विलास भाले, अधिष्ठाता डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.जी. देशमुख यांनी केले. यावेळी डॉ. भाले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ