आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा; अकोला संघाचा आठ गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:43 IST2018-12-10T14:43:10+5:302018-12-10T14:43:54+5:30

अकोला: १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सामना रविवारी भंडारा विरुद्ध अकोला संघात खेळला गेला. अकोला संघाने घरच्या मैदानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

 Interdistrict School Cricket Tournament; Akola won by 8 wickets | आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा; अकोला संघाचा आठ गडी राखून विजय

आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा; अकोला संघाचा आठ गडी राखून विजय

अकोला: १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सामना रविवारी भंडारा विरुद्ध अकोला संघात खेळला गेला. अकोला संघाने घरच्या मैदानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
भंडारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३९.१ षटकात सर्व बाद १३२ धावा भंडारा संघाने उभ्या केल्या. यामध्ये ऋषिकेश शेंडे याने सर्वाधिक २९ धावा काढल्या. अकोला संघाकडून शिवम पाटील, सिद्धांत मुळे, प्रसाद खुमकर, आहान जोशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अक्षयने १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात अकोला संघाने २५ षटकातच २ गडी गमवित १३३ धावा काढून लक्ष्य पूर्ण केले. आहान जोशीच्या नाबाद ६७ धावा विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याला सिद्धांत मुळेने नाबाद ३४ धावा काढून सुंदर साथ दिली. अनुज लांडे पहिल्या धावेवरच बाद झाला. प्रबळ चौखंडेने १८ धावांचे योगदान दिले. भंडारा संघाकडून भूषण शर्मा आणि वेदांत चहाडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
 
Web Title:  Interdistrict School Cricket Tournament; Akola won by 8 wickets

टॅग्स :Akolaअकोला