विमा कंपनी, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:03+5:302021-07-29T04:20:03+5:30

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीकविमा समितीची बैठक झाली. या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी ...

Insurance company, taluka level officials should conduct joint inspection | विमा कंपनी, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी

विमा कंपनी, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीकविमा समितीची बैठक झाली. या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बुधवारपर्यंत १३२५८ (ऑनलाइन व ऑफलाइन) पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती एचडीएफसी एर्गो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, नुकसान झालेले कोणीही विमाधारक शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित राहता कामा नये असे पहावे. अतिवृष्टीमुळे ज्या मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. अशा अधिसूचित क्षेत्रात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे लागू करायचे अधिसूचनेपूर्वी तालुका स्तरावरील अधिकारी व पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा. तसेच मृग बहरात अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील संत्रा पिकाचे अनुदान देणे बाकी असल्यामुळे ते त्वरित एआयसी विमा कंपनीने अदा करावे. तसेच १५ मे २०२० रोजी आंबिया बहार अंतर्गत अकोट तालुक्यात वेगाच्या वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फरकाची रक्कम एआयसी विमा कंपनीने त्वरित अदा करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.

Web Title: Insurance company, taluka level officials should conduct joint inspection