महापुरुषांचा अपमान थांबविण्यात यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:07+5:302021-09-15T04:24:07+5:30

तेल्हारा: नगर परिषदेद्वारे उद्यानांमध्ये लोखंडी पत्रावर महापुरुषांचे नाव टाकण्यात आले आहे. इतर ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च केला जातो, मात्र ...

Insult of great men should be stopped! | महापुरुषांचा अपमान थांबविण्यात यावा!

महापुरुषांचा अपमान थांबविण्यात यावा!

तेल्हारा: नगर परिषदेद्वारे उद्यानांमध्ये लोखंडी पत्रावर महापुरुषांचे नाव टाकण्यात आले आहे. इतर ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च केला जातो, मात्र महापुरुषांचे नावे पत्रावर टाकण्यात आले आहे. हा महापुरुषांचा अवमान आहे. हा अवमान थांबविण्याची मागणी करून पालिका चूक दुरुस्त करण्यास तयार नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा तेल्हारा विकास मंचच्या युवक आघाडीने ठाणेदारांना निवेदनातून दिला आहे.

यावेळी विकास मंच युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के, स्वप्निल सुरे, नितीन मानकर, विठ्ठल मामनकर, नीलेश मानकर, विजय रोडगे, रवींद्र वाडेकर, अक्षय सुरे आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Insult of great men should be stopped!