शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नारायणा ई टेक्नो स्कूल बंद करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश

By नितिन गव्हाळे | Updated: July 3, 2024 00:06 IST

...त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे लाखों रूपये शुल्क भरून नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कसे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला

अकोला: गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व महापालिकेच्या संयुक्त पाहणीत कौलखेडमधील राधानगरी येथे नव्यानेच सुरू झालेल्या नारायणा ई टेक्नो स्कूलजवळ शासन मान्यता, खाते मान्यता आणि युडायस संदर्भातील कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शाळेला प्राथमिक शिक्षण विभागाने कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे लाखों रूपये शुल्क भरून नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कसे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.                                                                                                             काही दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत भेट देऊन तपासणी केली असता, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला शासन मान्यता आहे का? प्राथमिक शिक्षण विभागाकडून युडायस क्रमांक घेतला का? जिल्हानिहाय खाते मान्यता घेतली का? घेतली असेल तर त्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. परंतु शाळा व्यवस्थापनाने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे शाळेला कागदपत्रे सादर करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला. मात्र, त्यानंतरही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. अखेर शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षामध्ये नारायणा ग्रुप ऑफ स्कूलने शासनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूल सुरु केल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तशी नोटीसही नारायणा ग्रुप ऑफ स्कूलच्या व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना बजावली आहे. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.बजावलेली नोटीस काय म्हणते?शासनाची, शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना, शाळा सुरु करणे हे नियमबाह्य आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या कलम १८ नुसार शाळेने सात दिवसांच्या आत शाळा बंद करून तसा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षामध्ये नारायणा ग्रुप ऑफ स्कूलने शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूल सुरु केल्याची बाब गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या पाहणीत व अहवालात आढळून आली आहे. कोणत्याही परवानगी शिवाय शाळा सुरु करणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे व्यवस्थापनाला शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे.-रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण