शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

धिंग्रा चौकाच्या रुंदीकरणासाठी पाहणी

By admin | Updated: February 27, 2015 00:36 IST

अकोला विकास आराखडा तयार करण्याची गरज.

अकोला: अरुंद रस्ते व विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज असल्याचा पाठपुरावा लोकमतने सतत केला. त्यानुषंगाने रस्ते विकासाच्या दिशेने पाऊल उचलत मनपाचे विरोधी पक्षनेता व अधिकार्‍यांनी धिंग्रा चौकाच्या रुंदीकरणासह सिव्हिल लाइन रस्त्याची गुरुवारी पाहणी केली. रस्त्यालगत थाटण्यात आलेले अतिक्रमण, बेशिस्त ऑटोचालक व खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे. त्यात भरीस भर अरुंद रस्ते, रस्त्याच्या मधोमध उभे ठाकलेल्या विद्युत खांबामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. शिवाय रस्त्यांवरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीची कोंडी टाळता येईल. याकरिता मनपा प्रशासनाने अशा अरुंद रस्त्यांची पाहणी करून त्याचा विकास आराखडा तयार करण्याची अपेक्षा आहे. रस्त्यावरील खड्डे, अरूंद रस्ते व बेशिस्त वाहतुकीच्या समस्येवर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर मनपाचे विरोधी पक्षनेता साजीद खान, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांनी काही प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मदनलाल धिंग्रा चौकाची मनपा पदाधिकारी, अधिकार्‍यांनी पाहणी करीत अपेक्षित बदल शक्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सिव्हिल लाइन रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागातील उपअभियंता राजेश श्रीवास्तव यांच्यासह कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.