आयजींकडून दोन पोलीस ठाण्यांचे निरीक्षण

By Admin | Updated: January 20, 2016 02:02 IST2016-01-20T02:02:08+5:302016-01-20T02:02:08+5:30

चार दिवस चालणार वार्षिक निरीक्षण, विशेष पोलीस महानिरीक्षक घेणार लेखाजोखा.

Inspection of two police stations from IG | आयजींकडून दोन पोलीस ठाण्यांचे निरीक्षण

आयजींकडून दोन पोलीस ठाण्यांचे निरीक्षण

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे मंगळवारपासून वार्षिक निरीक्षण सुरू केले. मंगळवारी मूूर्तिजापूर व जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले असून, यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-कर्मचार्‍यांचे कामकाज, त्यांनी केलेला तपास, दाखल झालेले गुन्हे, उघडकीस आणण्यात आलेले गुन्हे, पोलिसांची कामगीरी या सर्व बाबींचे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून वार्षिक निरीक्षण करण्यात येते. २0१५ या वर्षात अकोला जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारपासून घेण्यास सुरुवात केली. सिंघल यांनी मंगळवारी सुरुवातीला मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले. त्यानंतर सायंकाळी जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षण विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले. मंगळवारी सुरू झालेले हे वार्षिक निरीक्षण चार दिवस चालणार आहे. मूर्तिजापूर व जुने शहर पोलीस ठाण्यांचे निरीक्षण पहिल्या दिवशी आटोपले असून, आता खदान, सिटी कोतवालीसह शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे वार्षिक निरीक्षण करण्यात येणार आहे.

Web Title: Inspection of two police stations from IG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.