स्फोटाची एटीएसच्या चमूकडून पाहणी

By Admin | Updated: February 5, 2017 01:51 IST2017-02-05T01:51:29+5:302017-02-05T01:51:29+5:30

खा. प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

Inspecting the explosion by ATS team | स्फोटाची एटीएसच्या चमूकडून पाहणी

स्फोटाची एटीएसच्या चमूकडून पाहणी

बुलडाणा, दि. ४- खा. प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात कुत्रा ठार झाला. सदर स्फोट कशामुळे झाला याची शनिवारी दुपारी एटीएसच्या पथकाने पाहणी केली असून, पथकाला या ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तू निदर्शनास पडली नाही. खा. प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. सध्या जिल्ह्यात निवडणूक सुरू असल्यामुळे यामागे काही घातपाताचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला. तर खा. जाधव यांनी या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून छडा लावण्याची मागणी केली. एटीएसच्या पथकाने शनिवारी दुपारी पाहणी केली. तसेच कुत्र्याचे शव विच्छेदनासाठी पाठविले असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्फोटामागील कारण स्पष्ट होणार असल्याचे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरदास हिवाळे यांनी सांगितले.

Web Title: Inspecting the explosion by ATS team