शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:35 IST

तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले.

अकोला: अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प व जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या सुरक्षितेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, लघुसिंचन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, सहायक अभियंता अभिजित नितनवरे, शाखा अभियंता अनिल राठोड, नयन लोणारे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस.जी. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता कछोट उपस्थित होते.जिल्ह्यातील धरणांच्या भिंती व परिसर, धरणांचे गेट, सांडव्यावरून होणारा जलप्रवाह, धरणांच्या पायथ्याशी गावांना असलेला धोका, धरणांच्या गेटचे संचलन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा करणे या प्राथमिक बाबींसंदर्भात तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला दिले. तसेच जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत असलेल्या १९ तलावांची तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. धरणांच्या गेटचे संचलन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी विद्युत विभागाला दिल्या.पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या गावांत उपाययोजना करा!धरणांच्या पायथ्याशी असलेल्या गावांत सांडव्यावरून वाहणारे पाणी गावात शिरल्याने पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याची खातरजमा करून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले.लघुसिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे करा!लघुपाटबंधारे प्रकल्पांचे बांध फुटण्याच्या घटना होत असतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लघुसिंचन प्रकल्पांची तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याचे सांगत, प्रकल्पांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प