रेल्वेतून पडल्याने जखमी
By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T19:12:59+5:302014-05-31T21:55:22+5:30
पूर्णा-खंडवा मीटरगेज गाडीतून पडून एक जण गंभीर जखमी; बार्शीटाकळी तालुक्यातील घटना

रेल्वेतून पडल्याने जखमी
बार्शीटाकळी : पूर्णा-खंडवा या मीटरगेज मार्गावर धावणार्या रेल्वे गाडीतून पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील महागाव शिवारात शनिवारी घडली. वीरेंद्रसिंह मख्खनसिंह असे या जखमीचे नाव असून, तो पंजाब राज्यातील असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, महागाव शिवारात पूर्णा-खंडवा रेल्वेतून पडून एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती महागावचे पोलिस पाटील विष्णू मोरे यांनी बार्शीटाकळी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीस उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.