बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे आढळले अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:37 IST2018-02-14T01:36:23+5:302018-02-14T01:37:15+5:30

The infant found in Sangvi Jomdev in Balapur Taluka | बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे आढळले अर्भक

बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे आढळले अर्भक

ठळक मुद्देसदर अर्भक पुरुष जातीचे आहेअर्भकाला रुग्णालयात दाखल, उपचार सुरू अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

 


लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव/खामखेड : बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे एका शेतात मंगळवारी दुपारी अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर अर्भक पुरुष जातीचे आहे. पाच ते सहा तासांपूर्वी झालेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
सांगवी जोमदेव येथील गंगाराम चौके हे शेतात गेले असताना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्यांना अर्भक आढळले. त्यांनी याविषयी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी याविषयी बाळापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन अर्भकाला ताब्यात घेतले. पूर्ण वाढ झालेल्या या अर्भकाचा पाच ते सहा तासांपूर्वी जन्म झालेला होता. पोलिसांनी बाळाला अकोला येथील रुग्णालयात दाखल केले आहे. बालकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय कराळे करीत आहेत. 

Web Title: The infant found in Sangvi Jomdev in Balapur Taluka