शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण; सैनिकांच्या शौर्याचे श्रेय कधी घेतले नाही : शरद पवारांचा मोदींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 2:11 PM

नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

वाडेगाव (अकोला) : सैनिकांच्या शौर्याचा वापर आजवर कोणत्याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केला नव्हता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकून दाखविले; पण त्याचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी वाडेगाव येथे लगावला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या बाळापूर मतदारसंघाच्या उमेदवारासाठी वाडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. केंद्रातील मोदी सरकार देशाच्या संरक्षणाच्या मुद्याचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर करत आहेत, याची पोलखोल करताना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ‘घर में घुस के मारेंगे’ची भाषा करतात. मोदी हे स्वत: दिल्लीत बसून शत्रूला मारणार आहेत का, असा सवाल करत पवार यांनी मोदींची खिल्ली उडविली. देशापुढील मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या सरकारला शेतकऱ्यांप्रती कोणतीही आस्था नाही. दिलेला शब्द न पाळणारे हे सरकार असून, शेतकरी व सामान्य मानसांच्या व्यथा या सरकारने कधी समजूनच घेतल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकांवर असताना, हमीभाव व शेतकºयांविषयी कळवळ्याने बोलायचे. आता सत्तेत असताना हा कळवळा कुठे गेला असा सवालही यावेळी पवारांनी केला. या सरकारने दिलेले कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत राज्यातील ६१ टक्के शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नसल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले.मी अजूनही तरुणच!शरद पवार यांच्यावर उतरत्या वयातही प्रचारसभा घेण्याची वेळ आली आहे, असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु, मी अजुनही तरुण आहे. म्हातारा झालेलो नाही. आधी भाजपला घालवेल मगच मी जाईल, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019