‘सुकन्या समृद्धी’ योजनेला वाढता प्रतिसाद

By Admin | Updated: February 24, 2015 01:19 IST2015-02-24T01:19:29+5:302015-02-24T01:19:29+5:30

१0 दिवसांत उघडले १0७ पालकांनी मुलींचे खाते.

Increasing response to 'Sukanya Samriddhi' scheme | ‘सुकन्या समृद्धी’ योजनेला वाढता प्रतिसाद

‘सुकन्या समृद्धी’ योजनेला वाढता प्रतिसाद

अकोला : मुलीचे शिक्षण आणि विवाहाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना अल्पबचतीस प्रोत्साहित करणारी केंद्र शासनाची ह्यसुकन्या समृद्धीह्ण योजना १४ फेब्रुवारीपासून अकोला येथे डाक विभागामार्फत सुरू झाली. या योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत अवघ्या दहा दिवसांत मुख्य डाकघरात १0७ पालकांनी आपल्या मुलींचे खाते उघडले असल्याची माहिती स्थानिक डाक अधिकार्‍यांनी ालोकमतला दिली. जन्मदात्यांना मुलीच्या शिक्षणासाठी व तिच्या विवाहासाठी पैशांची चणचण भासू नये, यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर २0१४ मध्ये सुकन्या समृद्धी ही अल्पबचत योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीला जन्मदात्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात डाक कार्यालय वा कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये या योजनेंतर्गत खाते उघडण्याची मुभा शासनाने उपलब्ध केली आहे. आपल्या कन्यारत्नाप्रति प्रेम व्यक्त करण्याचं एक अनोखं माध्यम म्हणून अकोला डाक विभागाने व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी ही योजना अकोला विभागात कार्यान्वित केली. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १ लाख ५0 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक मुलीच्या पालकाला या खात्यात करण्याची र्मयादा ठेवण्यात आली आहे. शासनाने आर्थिक वर्ष २0१४-१५ करिता या योजनेकरीता ९.१ टक्के व्याजदर निश्‍चित केला आहे. या बचत खात्यात जमा होणारी रक्कम मुलीच्या २१ व्या वर्षी तिच्या उपयोगात पडणार असल्याने अनेक सजग पालकांनी आपल्या कन्येचे बचतखाते उघडण्यास प्रारंभ केला आहे. मंगळवार, २३ फेब्रुवारीपर्यंत अवघ्या दहा दिवसांत १0७ पालकांनी त्यांच्या १0 वर्षांखालील मुलीचे बचतखाते या योजनेंतर्गत उघडले असून, २५0 पेक्षा अधिक नागरिकांनी अर्जाची उचल केल्याची माहिती मुख्य डाक प्रवर्तक व्ही. पी. फिरके यांनी दिली.

Web Title: Increasing response to 'Sukanya Samriddhi' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.