Increase in retirement pay contribution of teachers, non-teaching staff! | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन अंशदानात वाढ!

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन अंशदानात वाढ!

अकोला: नोव्हेंबर २00५ पूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी शासनाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली. आता शासनाने अंशदान निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शासनाने अंशदानात वाढ केली आहे. कर्मचाºयांना महागाई भत्ता या रकमेच्या १0 टक्के इतके मासिक अंशदान द्यावे लागेल तर शासन १४ टक्के अंशदान देणार आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनाच्या अंशदानात वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन होता. हा निर्णय शासनाने १९ आॅगस्ट रोजी घेतला आहे. नोव्हेंबर २00५ पूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाºयांचे अंशदान म्हणून वर्गणीदाराचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १0 टक्के इतके मासिक अंशदान कपात कपात करण्यात येणार आहे. कर्मचाºयांच्या खात्यामध्ये यापुढे राज्य शासन स्वत:चा हिस्सासुद्धा टाकणार आाहे. वर्गणीदाराचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १४ टक्के इतके मासिक अंशदान देण्यात येणार आहे. शासनाने केलेली अंशदान वाढ ही १ एप्रिल २0१९ पासून देण्यात येईल. शासनाचा हा निर्णय मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांना लागू केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Increase in retirement pay contribution of teachers, non-teaching staff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.