प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:52 IST2020-01-08T14:52:42+5:302020-01-08T14:52:55+5:30
आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
अकोला: शहरातील गांधी रोडवरील चौपाटीवर प्रेम प्रकरणातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील गांधी रोडवरील चौपाटीवर अमोल सुरवाडे रा. भाटियावाडी, ता. बाळापूर हा मैत्रिणीसोबत असताना काही युवक या ठिकाणी आले आणि सुरवाडे यास मारहाण करीत जवळच्या एका बिल्डिंगच्या तिसºया मजल्यावर फरपटत नेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहून पळ काढला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अमोल सुरवाडे यास तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हे दाखल करून, आरोपींना अटक केली. सोहेल खान कफील खान रा. लाल बंगला, सलमान खान शकील अहमद खान रा. बैदपुरा, शेख अशफाक शेख मोहम्मद रा. सोनटक्के प्लॉट, तौसीफ खान अनवर खान रा. बैदपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी पोलीस कोठडीत होते. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.