हातरुण परिसरात आगीच्या घटनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:12+5:302021-02-23T04:28:12+5:30
शेख बिसमिल्ला मोहम्मद हनीफ यांच्या पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखाचे नुकसान ...

हातरुण परिसरात आगीच्या घटनात वाढ
शेख बिसमिल्ला मोहम्मद हनीफ यांच्या पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. घटनास्थळी पोहाेचून उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच वाजिद खान, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष नासीर खान, मोहम्मद हनीफ, शेतकरी शेख बिसमिल्ला, शेतकरी नीलेश बेंडे, उपसरपंच भास्कर डोंगरे, पंचायत समितीचे माजी सदस्य मंजूर शाह हजर होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
.........कोट..........
हातरुण गावामध्ये आगीचे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती आहे. महिनाभरापासून गावात विविध घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटना रोखण्यासाठी हातरुण येथील पोलीस चौकी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
- वाजिद खान, सरपंच, हातरुण.