घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक
By Admin | Updated: June 6, 2014 22:37 IST2014-06-06T18:20:53+5:302014-06-06T22:37:58+5:30
पैसे न देेण्यार्यांचे दडपले जातात प्रस्ताव

घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक
सायखेड : बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये घरकुल अनुदानाच्या देयकासाठी संबंधित विभागाच्या कर्मचार्यांकडून लाभार्थींची अडवणूक होत असून, पैसे न दिल्यास घरकुल प्रस्तावही दडपले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.
घरकुल लाभार्थींनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांना त्वरित अनुदान मिळण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जातात; परंतु बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांचे त्यांच्याच प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण नसल्यामुळे लाभार्थींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी बांधकामाच्या छायाचित्रासह प्रस्ताव आवक-जावक विभागात दिले जातात. सदर प्रस्ताव बांधकाम विभागात पाठविल्यानंतर जे लाभार्थी गैरमार्गाने पैसे देतील, त्यांचेच प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जातात. ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांची कागदपत्रे कार्यालयात धूळ खात पडतात. कधी घरकुलाचे छायाचित्र बरोबर नाही, तर कधी शौचालय नियमानुसार बांधले नाही, अशी कारणे सांगून घरकुल प्रस्ताव त्रुटीत पाठविले जातात. तालुक्यातील लाभार्थी दररोज पंचायत समिती कार्यालयात येरझारा घालतात; परंतु त्यांना कधी गटविकास अधिकारी नाहीत, तर कधी शाखा अभियंता नाहीत, अशी कारणे सांगितली जातात. चोहोगाव येथील काशीनाथ बिंबाजी इंगळे व बाळू सुखनंदन इंगळे, सायखेड येथील अरुण आनंदा तायडे यांनी घरकुलाच्या अंतिम देयकासाठी पं.स.मध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रस्ताव सादर केला. त्यांचे प्रस्तावावर गटविकास अधिकार्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरीही सदर प्रस्ताव दोन दिवस दडपून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी एकाने स्लॅबचे, तर दुसर्याने दुमजली घरकुल बांधले आहे.
या प्रकाराकडे गटविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष कंे द्रित करून या प्रकाराला प्रतिबंध घालावा, अशी लाभार्थींची मागणी आहे.